प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात संताली भाषेचे महत्व : एक चिकित्सक अभ्यास

Authors

  • Sumedh Ranvir Visva-Bharati University, Santiniketan

Keywords:

संथाल समाज, संताली भाषा, मातृभाषा, ओल चिकी लिपी, भाषिक अस्मिता, सांस्कृतिक संवर्धन.

Abstract

भारत हा बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक देश असून येथे विविध आदिवासी समुदायांच्या भाषा, संस्कृती, परंपरा आणि जीवनपद्धती अस्तित्वात आहेत. या विविधतेमध्ये संथाल समाजाचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. संथाल समाजाची संताली भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून त्या समाजाची सांस्कृतिक अस्मिता, ऐतिहासिक परंपरा आणि सामूहिक जीवनानुभव व्यक्त करणारे महत्त्वपूर्ण साधन आहे. शिक्षणाच्या प्रक्रियेत मातृभाषेचे स्थान अनन्यसाधारण असून विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीचा, बौद्धिक क्षमतेचा आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास मातृभाषेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे होऊ शकतो. तथापि, भारतातील आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेत अनेक भाषिक, सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागतो. संताली भाषेच्या संदर्भात लिपीचा प्रश्न, पाठ्यपुस्तकांची उपलब्धता, प्रशिक्षित शिक्षकांचा अभाव, रोजगाराच्या संधी आणि विविध राज्यांची भाषाविषयक धोरणे हे प्रश्न विशेष महत्त्वाचे आहेत. प्रस्तुत संशोधनपर लेखात संताली भाषेचा ऐतिहासिक विकास, ओल चिकी लिपीची निर्मिती, भारतीय राज्यघटनेतील भाषिक व शैक्षणिक तरतुदी, आदिवासी शिक्षणातील मातृभाषेचे महत्त्व, संताली भाषेच्या माध्यमातून शिक्षणाचे फायदे आणि त्यासमोरील आव्हाने यांचा चिकित्सक दृष्टिकोनातून विचार करण्यात आला आहे. आदिवासी समाजाच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासासाठी मातृभाषाधारित शिक्षणव्यवस्था विकसित करण्याची आवश्यकता हा या अभ्यासाचा प्रमुख निष्कर्ष आहे

Downloads

Published

2026-11-23

Issue

Section

Articles

How to Cite

प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात संताली भाषेचे महत्व : एक चिकित्सक अभ्यास. (2026). Vagdhara : A Multilingual Peer Reviewed Reserach Journal, 1(3), 59-63. https://vagdhara.in/index.php/vagdhara/article/view/37

Similar Articles

11-20 of 26

You may also start an advanced similarity search for this article.